शिवसेनेच्या नावाखाली माधुकरी मागू नका, स्वतःच्या ताकतीवर निवडून या- संजय राऊत
शिवसेनेच्या नावाखाली माधुकरी मागू नका असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वतःच्या बळावर निवडून या असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. दुसरीकडे संजय राऊत हे रोज सकाळी उठून फक्त बोलत असतात. मला राज्याच्या पूर परिस्थितीवरही लक्ष द्यायचे आहे असे प्रतिउत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. संजय राऊत यांनी दिलेल्या […]
शिवसेनेच्या नावाखाली माधुकरी मागू नका असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वतःच्या बळावर निवडून या असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. दुसरीकडे संजय राऊत हे रोज सकाळी उठून फक्त बोलत असतात. मला राज्याच्या पूर परिस्थितीवरही लक्ष द्यायचे आहे असे प्रतिउत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले की ते बेईमान असूनही स्वतःच्या बेईमानीची करणे देत असतात. तुम्ही शिवसेना सोडलेली आहे आणि शिवसेनेचा वापर करून माधुकरी मागू नका असे ते म्हणाले. स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन करून स्वतःचा वेगळा संसार मांडा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
Published on: Jul 16, 2022 03:21 PM