Amol Kolhe | कोणाच्या आश्रयाला जाऊन राजकारण करु नये, आढळराव पाटील यांचे नाव न घेता, खासदार अमोल कोल्हे यांचा टोला
Amol Kolhe | कोणाच्या आश्रयाला जाऊन राजकारण करु नये, माजी खासदार शिवाजीरावआढळराव पाटील यांचे नाव न घेता, खासदार अमोल कोल्हे यांनी टोला लगावला.
Amol Kolhe | कोणाच्या आश्रयाला जाऊन राजकारण करु नये, माजी खासदार शिवाजीरावआढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil)यांचे नाव न घेता, खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी टोला लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच शिरुर येथील समस्यांबाबत, लोकांच्या प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात सर्व आढावा घेतला. या बैठकीला स्थानिक आमदार आणि खासदार अमोल कोल्हे यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. हा चुकीचा पायंडा असल्याचा आरोप कोल्हे यांनी केला. लोकप्रतिनिधींनाच या बैठकीना बोलवण्यात न आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. यामागे शिंदे गटात सहभागी लोकांचा हात असल्याचा अप्रत्यक्ष टोला त्यांनी हाणला.
मालिकेच्या नावावरुन विकास कामांना नाव नाही
डॉ. अमोल कोल्हे यांच्या स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका खूप गाजली होती. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या समाधीस्थळाच्या विकास कामांना चालना दिली आहे. ही चांगली बाब आहे. या विकास कामाच्या नावात कोल्हे यांनी स्वराज्यरक्षक हा शब्द जोडण्याची विनंती केली होती. त्यावरुन डॉ. कोल्हे त्यांच्या मालिकेचे प्रमोशन करत असल्याची टीका करण्यात येत होती. हा दळभद्री विचार असल्याचा उलटवार कोल्हे यांनी केला आहे.