Covid-19 Vaccine : जूनपासून लहान मुलांनाही कोव्हॅक्सिनचा डोस, पाहा कसं असेल नियोजन
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा देशातील लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे, असा इशारा आतापर्यंत अनेक तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून लहान मुलांच्या संरक्षणासाठी विशेष पावले उचलण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जून महिन्यांपासून लहान मुलांवरील कोव्हॅक्सिन (Covaxin) लसीच्या ट्रायलला सुरुवात होणार आहे.