Maharashtra Bhushan Award 2022 : डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

| Updated on: Apr 16, 2023 | 12:16 PM

Dr. Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan Award : डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. पाहा व्हीडिओ...

खारघर : पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan Award) प्रदान करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबईतील (Navi Mumbai) खारघरच्या (Kharghar) सेंट्रल पार्क मैदानामध्ये हा कार्यक्रम पार पडला. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या इतर मंत्री आमदार आणि खासदार उपस्थित होते. शिवाय 20 लाखांहून अधिक श्रीसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

Published on: Apr 16, 2023 11:43 AM
‘मविआची कसली सभा, यांच्यात खुर्चीवरून भांडणं’, कुणी केला हल्लाबोल
नागपूरमध्ये आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा; सुरक्षाव्यवस्था कशी आहे?