नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे

| Updated on: Jan 11, 2023 | 4:24 PM

तत्कालीन आमदार प्रतापदादा सानवणे त्यांच्या खासदारकीमुळे रिक्त झालेल्या जागेवर अवघ्या ११ महिन्यांच्या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. तांबे यांनी निवडणूक लढविली होती.

नाशिक : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते गुरुवारी (दि. १२) आपला उमेदवारी अर्ज काँग्रेसचे नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दाखल करणार आहेत. डॉ. सुधीर तांबे यांना नाशिक मतदारसंघातून काँग्रेसतर्फे सलग चौथ्यांदा उमेदवारी मिळाली आहे.

२००९ मध्ये तत्कालीन आमदार प्रतापदादा सानवणे धुळे लोकसभा मतदारसंघात विजयी झाले होते. त्यांच्या खासदारकीमुळे रिक्त झालेल्या जागेवर अवघ्या ११ महिन्यांच्या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. तांबे यांनी निवडणूक लढविली होती.

त्यावेळी काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅड. नितीन ठाकरे, भाजपचे उमेदवार डॉ. प्रसाद हिरे यांचा हजार मतांनी त्यांनी पराभव केला होता.

Published on: Jan 11, 2023 04:24 PM
MLA Amol Mitkari : कोल्हापूरच्या मातीशी जो नडला; सोमय्यांना राष्ट्रवादीचा इशारा
Gulabrao Patil : मला त्यावर बोलायचं नाही; गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंबद्दल असं का म्हणाले?