एक हसिना थी…. दो दिवाने! कुरुलकर पाठोपाठ निखील शेंडेही हनी ट्रॅपच्या जाळ्यात… देशाची सुरक्षा राम भरोसे
राज्यातील विरोधकांसह या प्रकरणावर प्रकरणावर हिंदू महासंघ देखील आक्रमक झाल्याचे दिसत आहे. यावरूनच महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आक्रमक प्रतिक्रिया देताना प्रदीप कुरुलकर यांच्या परिवाराला पण ताब्यात घ्या आणि चौकशी करा अशी मागणी केली आहे.
मुंबई : डीआरडी ओचे संचालक प्रदीप कुरुलकर आणि भारतीय वायुदलात तैनात असलेले निखिल शेंडे या दोघांना फसवण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेकडून दोन महिलांचे फोटो वापरण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरून देशाची सुरक्षा ही आता राम भरोसेच असल्याचे समोर येत आहे. त्यावरून देशाच एकच गोंधळ उडाला आहे. तर राज्यातील विरोधकांसह या प्रकरणावर प्रकरणावर हिंदू महासंघ देखील आक्रमक झाल्याचे दिसत आहे. यावरूनच महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आक्रमक प्रतिक्रिया देताना प्रदीप कुरुलकर यांच्या परिवाराला पण ताब्यात घ्या आणि चौकशी करा अशी मागणी केली आहे. तर घरातील कर्त्या नव्हे कार्ट्या पुरुषाकडे नेहमीपेक्षा जास्त पैसा येतो आहे. त्यांचे संपर्क संशयास्पद आहेत, याची घरच्यांना कल्पना असणारच आहे, त्यामुळे घर्च्यांची चौकशी व्हावी. शिवाय या प्रकरणी देशद्रोही स्लीपर सेल्सना सुद्धा गुन्ह्यातील सहभागी म्हणून कलमे लावून अटक करावी. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या पूर्ण कुटुंबाची मालमत्ता जप्त करावी, अशी आक्रमक मागणी दवे यांनी केली आहे. तर प्रदीप कुरुलकर आणि निखिल शेंडे हे अधिकारी अधिकारी हनीट्रॅपमध्ये कसे सापडले आणि त्यांच्याविरोधात काय मागणी होत आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट