आता मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमधील मंदिरातही ड्रेसकोड? 18 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता; मंदिरांचा आकडा गेला 114 वर
जळगाव, अकोला, धुळे, नागपूर, नाशिक, अमरावती, अहिल्यानगर (नगर) यांसह कोकण विभागातील मिळून राज्यातील एकूण 114 मंदिरांमध्ये आता वस्त्रसंहिता असेल. ही माहिती मुंबईत शीतलादेवी मंदिरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत घनवट यांनी दिली.
मुंबई : मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील 18 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली. जळगाव, अकोला, धुळे, नागपूर, नाशिक, अमरावती, अहिल्यानगर (नगर) यांसह कोकण विभागातील मिळून राज्यातील एकूण 114 मंदिरांमध्ये आता वस्त्रसंहिता असेल. ही माहिती मुंबईत शीतलादेवी मंदिरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत घनवट यांनी दिली. तर महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने 7 जून रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांतील मंदिरांच्या विश्वस्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला उपस्थित सर्व मंदिरांच्या विश्वस्तांनी मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा ठराव एकमताने संमत केला, असे घनवट यांनी सांगितले.
Published on: Jun 10, 2023 07:10 AM