Buldana | बुलडाणा कोव्हिड सेंटरमध्ये मद्यधुंद पोलिसाचा धिंगाणा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Buldana | बुलडाणा कोव्हिड सेंटरमध्ये मद्यधुंद पोलिसाचा धिंगाणा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: Jun 30, 2021 | 8:27 PM

बुलढाण्यातील अपंग निवासी विद्यालयातील कोविड सेंटरमध्ये मद्यधुंद पोलिसाचं हे नाट्य रंगलं. या कर्मचाऱ्याने आरोपीला तपासणीसाठी येथे आणले होते. (Drunken police brawl at Buldana Covid Center, video goes viral on social media)

बुलढाणा : कोरोनाग्रस्त असलेल्या आरोपीला उपचारासाठी सोबत घेऊन आलेल्या मद्यधुंद पोलिसाने कोविड सेन्टरमधेच धिंगाणा घातल्याचा प्रकार बुलढाण्यात घडला आहे. या धिंगाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. बुलढाण्यातील अपंग निवासी विद्यालयातील कोविड सेंटरमध्ये मद्यधुंद पोलिसाचं हे नाट्य रंगलं. या कर्मचाऱ्याने आरोपीला तपासणीसाठी येथे आणले होते, दरम्यान महिला कर्मचाऱ्यांनी या पोलिसाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता फुल्ल टू ऑन झालेल्या या पोलिसाने उलट त्यांनाच दमदाटी केली. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडलेला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Breaking | राज्य सरकार कर्मचाऱ्यांना थकबाकीचा दुसरा हफ्ता मिळणार
ठरलं! असं होईल, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान