उल्हासनगरमध्ये पहायला मिळतोय दुबईचा बुर्ज खलिफा

| Updated on: Sep 07, 2022 | 10:29 PM

उल्हासनगरच्या( Ulhasnagar) कॅम्प ४ मध्ये यूएफसी ग्रुपच्या वतीनं गणेशोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी वैविध्यपूर्ण देखावे उभारण्यासाठी हे मंडळ प्रसिद्ध आहे. यंदा या मंडळाने दुबईतील(Dubai) बुर्ज खलिफा(Burj Khalifa ) या जगातील सर्वात उंच इमारतीची प्रतिकृती उभारली आहे.

ठाणे :  उल्हासनगरच्या( Ulhasnagar) कॅम्प ४ मध्ये यूएफसी ग्रुपच्या वतीनं गणेशोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी वैविध्यपूर्ण देखावे उभारण्यासाठी हे मंडळ प्रसिद्ध आहे. यंदा या मंडळाने दुबईतील(Dubai) बुर्ज खलिफा(Burj Khalifa ) या जगातील सर्वात उंच इमारतीची प्रतिकृती उभारली आहे. सोबतच गंगा प्रकट कशी झाली, याचं चलचित्र देखील सादर करण्यात आलं आहे. तर गणपती बाप्पाची भव्य मूर्ती देखील आकर्षणाचा विषय आहे. त्यामुळं उल्हासनगरच नव्हे, तर शेजारच्या अंबरनाथ, कल्याण या शहारांमधूनही भाविक हा देखावा पाहण्यासाठी येत आहेत.
Published on: Sep 07, 2022 10:29 PM
मुंबईत शिंदे गटाची दुसरी शाखा उघडली; भरत गोगावलेंच्या हस्ते उद्घाटन
Amravati Missing Girl: बेपत्ता तरुणी सापडण्यात विहिंप, बजरंग दल, भाजपची मोठी मदत- अनिल बोंडे