शेती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश; “नुकसानभरपाई द्या, नाहीतर…”, दिला सरकारला इशारा!

| Updated on: Jul 25, 2023 | 10:12 AM

जळगावात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेती वाहून गेल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहे. भरपूर मदत द्या, तुकडी मदत करू नका नाहीतर उपोषणाला बसू असा इशारा शेतकऱ्यांनी केला आहे.

जळगाव, 25 जुलै 2023 | गेल्याकाही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. जळगावत पडलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे जळगावमधील मुक्ताईनगर हलखेडा शिवारातील शेतकऱ्यांची शेती वाहून गेली. शेती वाहून गेल्याने 50 शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी शेतात हंबरडाफोडला आहे. भरपूर मदत द्या, तुकडी मदत करू नका नाहीतर उपोषणाला बसू असा इशारा शेतकऱ्यांनी केला आहे.आदिवासी बांधवांच्या अंदाजे दोनशे हेक्टर शेती नुकसान झाले आहे.

 

Published on: Jul 25, 2023 10:12 AM
वेद बारणे या चिमुरड्याच्या फडणवीस यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा; फडणवीस यांनीही केले कौतुक
पुण्यात वाहनांच्या तोडफोडीनंतर नाशकात तोडफोड सत्र सुरू; तलवारी आणि कोयत्याने काचा फोडल्या