यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे मोठं नुकसान; उमरी कापेश्वरजवळील पूल गेला वाहून
मुसळधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील पूल पुरात वाहून गेला. हा पूल वाहून गेल्याने 40 हून अधिक गावांचा संपर्क तुटला होता, मात्र सध्या या पुलावर तात्पुरता रस्ता तयार करण्याच काम सुरु आहे.
यवतमाळ, 28 जुलै 2023 | राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसाने यवतमाळ जिह्याला झोडपलं आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेत खरडून गेले आहेत. या पुराच्या पाण्याने अनेक घरात सुद्धा पाणी शिरले होते.पावसामुळे जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील उमरी कापेश्वर येथील पैनगंगा नदीवरील पूल पुरात वाहून गेला. हा पूल वाहून गेल्याने विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला होता. या सावळी भागातील 40 हून अधिक गावाचा संपर्क तुटला होता, मात्र सध्या या पुलावर तात्पुरता रस्ता तयार करण्याच काम सुरु आहे.
Published on: Jul 28, 2023 11:31 AM