मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला पूर, चंद्रपूर शहरातील अनेक भाग जलमय
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वर्ध्यातील नद्या आणि नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूर शहरात देखील पाणी शिरायला सुरुवात झाली आहे.
चंद्रपूर, 23 जुलै 2023 | गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वर्ध्यातील नद्या आणि नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूर शहरात देखील पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर शहरातल्या रहमतनगर, सिस्टर कॉलनी, तिमांडे ले-आउटमधल्या हजारो घरांना पुराच्या पाण्याचा विळखा पडलाय. चंद्रपूर शहर हे इरई आणि झरपट नद्यांच्या किनाऱ्यावर आहे आणि या नद्यांचं पाणी हे वर्धा नदीला जाऊन मिळतं.मात्र वर्धा नदीने धोक्याची पातळी गाठल्याने चंद्रपूर शहरात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे.पुराचं हे पाणी वाढण्याच्या भीतीने अनेक लोकांनी आपलं सामान स्थलांरित करण्यास सुरुवात केली आहे.
Published on: Jul 23, 2023 01:31 PM