मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; शाळांना सुट्टी, शिक्षणमंत्री दीपक केसरकर काय म्हणाले ?

| Updated on: Jul 08, 2024 | 12:16 PM

मुंबईसह राज्यभरात काल रात्रीपासून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. सहा तासांत ३०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र या पावसामुळे मुंबईची दैना उडाली असून रोजच्या जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे.

Follow us on

मुंबईसह राज्यभरात काल रात्रीपासून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. सहा तासांत ३०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र या पावसामुळे मुंबईची दैना उडाली असून रोजच्या जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळ लोकांना घराबाहेर पडणंही कठीण झालं आहे. या पावसाच्या पाण्याने शाळांनाही विळखा घातला असून मुंबईसह अनेक ठिकाणी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.शिक्षणंमंत्री दीपक केसरकर यांनीही यासंदर्भात घोषणा केली. मुंबई तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं त्याचा आता निचरा व्हायला सुरूवात झाली आहे. मात्र अद्यापही सायन चुनाभट्टी तसेच एलबीएस रोडवर पाणी साचले असून तेथे अधिकचे पंप लावून पाणी काढण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे केसरसर यांनी सांगितलं.