यवतमाळला हवामान विभागाचा मध्यरात्रीपासून रेड अलर्ट; मुसळधार पावसामुळे पाणी शिरेल नागरिकांच्या घरात
यवतमाळ तालुक्यातील येरद गावाला लागून असलेल्या नाल्याला पूर आल्याने आजू बाजूच्या शेतात देखील पाणी शिरले आहे. बाभूळगाव तालुक्यातील भिलुक्सा बोरगाव गावाला पुराचा वेढा आहे.
यवतमाळ | 22 जुलै 2023 : रात्री पासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यात हाहाकार मजला आहे. यवतमाळ, आर्णी, बाभूळगाव राळेगाव तालुक्यातील शेती जल मय झाली आहे. शेतात तीन ते चार फूट पाणी साचले आहे. यवतमाळ तालुक्यातील येरद गावाला लागून असलेल्या नाल्याला पूर आल्याने आजू बाजूच्या शेतात देखील पाणी शिरले आहे. बाभूळगाव तालुक्यातील भिलुक्सा बोरगाव गावाला पुराचा वेढा आहे. या भागातही प्रचंड प्रमाणात शेतीचं नुकसान झाले. याचदरम्यान मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे यवतमाळ शहरातील पिंपळगाव, लोहारा, अंजनीय, सोसायटी, वडगाव, तलाव फाईल, महानंदानगर या भागामध्ये पावसाचे पाणी साचून अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होताना पाहायला मिळत आहे. तर मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठा प्रमाणात पूर आलेला आहे. अशातच यवतमाळ-नेर मार्गावरील लासीन जवळ असलेल्या दोन्ही नाल्याला पूर आल्याने यवतमाळ-नेर हा महामार्ग पूर्णतः बंद झाला आहे. यवतमाळ रस्ता लासीना जवळ पुरामुळे बंद झाला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात मध्यरात्रीपासून रेड अलर्ट दिला होता.