नागपूरच्या विहीरगावाला मुसळधार पावसाने झोडपलं; पुराच्या पाण्यामुळे बहादुरा ते विहीरगावमधील रस्ता बंद
राज्यभरात मुसळधार पाऊस पडत आहे. नागपुरलादेखील काल मुसळधार पावसाने झोडपलं आहे. दरम्यान आता नागपुरमध्ये पावसाचा जोर आता कमी झालाय. परंतु नागपुर जिल्ह्यातील नद्या तुडुंब भरून वाहत असल्याने विहीरगावाला पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे.
नागपुर, 28 जुलै 2023 | राज्यभरात मुसळधार पाऊस पडत आहे. नागपुरला देखील काल मुसळधार पावसाने झोडपलं आहे. दरम्यान आता नागपुरमध्ये पावसाचा जोर आता कमी झालाय. परंतु नागपुर जिल्ह्यातील नद्या तुडुंब भरून वाहत असल्याने विहीरगावाला पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. बहादुरा ते विहीरगावामधील रस्त्यावर पाणी आल्यान रस्ता बंद झाला आहे. मुसळधार पावसामुळे विहीरगाव शेजारील नाल्याला सुद्धा पूर आलेला आहे. नरेंद्र पुराखाली पावसाचं पाणी साचलं आहे.
Published on: Jul 28, 2023 10:25 AM