पावसाचा जोर वाढला? या जिल्ह्यातील पुल गेला पाण्याखाली, दहा पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला
राज्याच्या अनेक जिल्ह्यात सध्या पाऊस पडत आहे. तर कोकण पट्ट्यात तर चांगलचं झोडपून काढत आहे. मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यातही पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. तर पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
पालघर : गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांसह सामान्यांशी दडीचा खेळ खेळणाऱ्या पावसाने आता चांगलाच जोर धरला आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यात सध्या पाऊस पडत आहे. तर कोकण पट्ट्यात तर चांगलचं झोडपून काढत आहे. मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यातही पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. तर पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तेथे गेल्या काही दिवसापासून संततधार सुरू आहे. ज्यामुळं जव्हार झाप रस्त्यावरील फोंडीचा पाडा येथील पूल पाण्याखाली गेला आहे. हा पूल पाण्याखाली गेल्याने दहा पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.
Published on: Jul 02, 2023 09:56 AM