रत्नागिरीतल्या नागरिकांच्या खिशाला चाट; बहुतांश भाज्या शंभरीच्या पटीत

| Updated on: Aug 09, 2023 | 9:47 AM

मात्र गेल्या महिन्याभरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तर पाणी साचून राहिल्याने शेतीचे प्रचंड नुकसान हे अनेक भागात झाले. पावसाचा फटका पश्चिम महाराष्ट्राला देखील बसला आहे.

रत्नागिरी,9 ऑगस्ट 2023 । सध्या राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाने उसंत दिली आहे. त्यांमुळे आता कुठे शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र गेल्या महिन्याभरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तर पाणी साचून राहिल्याने शेतीचे प्रचंड नुकसान हे अनेक भागात झाले. पावसाचा फटका पश्चिम महाराष्ट्राला देखील बसला आहे. तर यामुळे आता रत्नागिरी जाणारी भाज्यांची आवक घटली आहे. तर भाज्यांची आवक घटल्याने त्याचा परिणाम हा थेट बाजारावर होत आहे. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणाऱ्या भाज्यांची आवक 20 टक्क्यांनी घटली आहे. ज्यामुळे बहुतांश भाज्या शंभरीच्या पटीत गेल्या आहेत. सध्या घेवडा, गवार, फरसबी, हिरवी मिरची, मटार आणि भेडी देखिल १०० रुपये किलोच्यावर गेली आहे. दरवाढीमुळे ग्राहक मेटाकुटीला आले असून अनेकांच्या ताटामधून भाजी गायब झाल्याचेही दिसत आहे. तर रत्नागिरीत अनेकांना रान भाज्यांवर जेणात मेनूचा बेत करावा लागत आहे.

Published on: Aug 09, 2023 09:47 AM
बस चालकाने ओव्हरटेक केला अन् बस 50 फूट खोल खड्ड्यात कोसळली!
पोलीस चौकीतच मांडला जुगाराचा डाव, व्हिडीओ व्हायरल; उपराजधानीत नेमकं काय घडलं?