मुसळधार पावसाचा कोल्हापूरच्या विशाळगडला फटका; गाडाचा बुरूज ढासळला

| Updated on: Jun 28, 2023 | 2:18 PM

जिल्ह्यातील विविध भागात जारदार पाऊसाला सुरूवात झाली आहे. येथे अनेक भागात पाऊस जोरदार लागत असून त्याचा फटका आता बसताना दिसत आहे.

कोल्हापूर : जूनच्या अखेरीस सुरू झालेल्या पावसाने अखेर जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील विविध भागात जारदार पाऊसाला सुरूवात झाली आहे. येथे अनेक भागात पाऊस जोरदार लागत असून त्याचा फटका आता बसताना दिसत आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगड किल्ल्याला देखील मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. येथील बुरूज हा मुसळधार पावसामुळे ढासळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे याबाबत पुरातत्वविभागाकडे याच्या दुरूस्तिची मागणी कऱण्यात आली होती. मात्र विभागाच्या दुर्लक्षामुळे हा बुरूज अखेर कोसळला आहे. यामुळे शिवप्रेमींतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 28, 2023 02:18 PM
आंबेनळी घाटात काय झालं की वाहतूक ताम्हिणी घाटातून फिरवली, पहा नेमकं काय झालय घाटात?
“आता देशाची राजधानी दिल्ली नव्हे, तर अहमदाबाद”, प्रकाश आंबेडकर यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर बोचरी टीका