Mega block | रेल्वे ट्रॅकवरुन चालत जाण्याची प्रवाशांवर नामुष्की, मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल!

| Updated on: Feb 05, 2022 | 5:05 PM

72 Hours Mega block on Central Railway : जीवघेणा प्रवास करत लोक रेल्वे ट्रॅकवरुनच निघालेत. मेगाब्लॉकमुळे सगळ्या गाड्या या धीम्या मार्गावरुन सुरु ठेवण्यात आल्या आहेत.

72 तासांचा मेगाब्लॉक असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या (Central Railway Mega block) समस्येला सामोरं जावं लागतंय. दुप्पट वसुली प्रवाशांकडून केली जात असल्यामुळे अखेर रेल्वे ट्रॅकवरुनच कर्मचारी वर्गानं जाणं पसंत केलंय. जितका वेळ बसला लागणार, तितक्या वेळात लोक चालक रेल्वे ट्रॅकवरुन ठाण्याता पोहोचण्यासाठी कसरत करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. यावेळी मेगाब्लॉकमुळे कळवा स्लो ट्रॅकवरुन (Kalwa Slow Track) लोकांनी चालत जात ठाणे स्टेशन गाठलं. जीवघेणा प्रवास करत लोक रेल्वे ट्रॅकवरुनच निघालेत. मेगाब्लॉकमुळे सगळ्या गाड्या या धीम्या मार्गावरुन सुरु ठेवण्यात आल्या आहेत. अनेक प्रवासांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना या मनस्तापाबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

खासदार उदयनराजे भोसले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला
कॉमेडीवर काय उत्तर देऊ, आदित्य ठाकरे यांची अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया