साताऱ्यातील केळघर घाटात दरड कोसळल्यामुळे महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक बंद
महाबळेश्वर केळघर घाट रस्त्यावर मोठी दरड कोसळली आहे. त्यामुळे सातारा महाबळेश्वर रस्ता पूर्णतः वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
सातारा : महाबळेश्वर केळघर घाट रस्त्यावर मोठी दरड कोसळली आहे. त्यामुळे सातारा (Satara) महाबळेश्वर (Mahabaleshwar) रस्ता पूर्णतः वाहतुकीसाठी बंद झाला आहे. या भागात दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. आज सकाळी केळघर घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. बांधकाम विभागाकडून ही दरड हटवण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देखील या भागात दरड कोसळली होती.
Published on: Sep 30, 2022 11:02 AM