साताऱ्यामध्ये इर्शाळाडीच्या पुनरावृत्तीची भीती, मोरेवाडी गावच्या डोंगराला भेगा

| Updated on: Jul 23, 2023 | 8:33 AM

इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर दरडग्रस्त गावांच्या स्थलांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान सातारा जिल्हातील एका गावात डोंगराला भेगा पडल्यामुळे इर्शाळवाडीच्या पुनरावृत्तीची भीती आहे.

सातारा, 23 जुलै 2023 : इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर दरडग्रस्त गावांच्या स्थलांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान सातारा जिल्हातील एका गावात डोंगराला भेगा पडल्यामुळे इर्शाळवाडीच्या पुनरावृत्तीची भीती आहे. काल दिवसभरात साताऱ्यामध्ये जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे मोरेवाडी या ठिकाणी डोंगराला भेगा पडल्या. काही भाग खचला आहे.त्यामुळे मोरेवाडी गावात भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय. मोरेवाडी गावातील 23 कुटुंब सुरक्षित स्थळी हलवण्यात आली आहेत.23 कुटुंबांना शेल्टरमध्ये हलवण्यात आलंय. ही शेल्टर्स मोरेवाडी गावाजवळच बनवण्यात आली आहेत. या ठिकाणी ही कुटुंब सध्या राहात आहेत.

Published on: Jul 23, 2023 08:33 AM
अकोला जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, शहरातल्या रामसेतू पुलावर 2 ते 3 फूट पाणी….!
‘काही प्रश्नांची उत्तर द्यायचे नाहीत असे शासनाने ठरवलंय’; काँग्रेस नेत्याचा सरकारला टोला