राजकारण पोहचलं राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाच्या घरापर्यंत; बंगल्याच्या भिंतीवर लिहलं गद्दार!
कर्जत बाजार समितीतून झालेल्या हा पराभवामुळं रोहित पवार यांचे समर्थक तथा युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी दुपारी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या कर्जत बंगल्याच्या भिंतीवर शाई फासली. तसेच घोषणाबाजी करत बंगल्याच्या भिंतीवर काळ्या शाईने गद्दार असे लिहून निषेध व्यक्त केला आहे
कर्जत : येथे काही दिवसांपुर्वीच कर्जत बाजार समितीच्या निवडणूका पार पडल्या. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र कर्जत बाजार समितीचा गड राम शिंदे यांनी जिंकत भाजपचा झेंडा फडकवलाच. त्याचबरोबर सभापती, उपसभापतीही भाजपचाच केला. त्यामुळे भाजपचा हा विजय राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
कर्जत बाजार समितीतून झालेल्या हा पराभवामुळं रोहित पवार यांचे समर्थक तथा युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी दुपारी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या कर्जत बंगल्याच्या भिंतीवर शाई फासली. तसेच घोषणाबाजी करत बंगल्याच्या भिंतीवर काळ्या शाईने गद्दार असे लिहून निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे आता कर्जतमध्ये राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी असा सामना पहायला मिळत आहे. तर राष्ट्रवादीची मते फुटल्याने भाजपचा सभापती, उपसभापती झाल्याचे बोललं जात आहे.
तर यावरून घराला काळ फसण्याचं समर्थन करणार नाही, पण कार्यकर्त्यांनी निवडणूकीत घेतलेल्या मेहनतीवर अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. म्हणूनच त्यांनी हे कृत्य केल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलीये.