भय इथलं संपत नाही? आदिवासी भागात रस्ताच नाही? गरोदर महिलांना करावं लागतं झोळी करुन रुग्णालयात दाखल

| Updated on: Jul 16, 2023 | 2:50 PM

तर शिरपूर तालुक्यातील उत्तरेला मध्यप्रदेश सीमेवरील दुर्गम डोंगराळ क्षेत्रात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या थुवानपाणी व निशाणपाणी या दुर्गम क्षेत्रात येण्याजाण्यासाठी चांगले पक्के रस्ता नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होतात.

धुळे | 16 जुलै 2013 : अजुनही राज्यातील आदिवासी भागात रस्ता नसल्याने रूग्णांना असो की गरोदर महिलांना झोळी करुन रुग्णालयात न्यावं लागतं. असाच धक्कादायक प्रकार शिरपूर तालुक्यातील गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या थुवानपाणी येथे घडला आहे. तर शिरपूर तालुक्यातील उत्तरेला मध्यप्रदेश सीमेवरील दुर्गम डोंगराळ क्षेत्रात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या थुवानपाणी व निशाणपाणी या दुर्गम क्षेत्रात येण्याजाण्यासाठी चांगले पक्के रस्ता नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होतात. रस्त्याची सोय नसल्याने थुवानपाणी येथील एका महिलेला चक्क बांबूंना फडके बांधून त्याची झोळी करुन तीन किलोमीटर अंतरावर न्यावं लागलं आहे. तर गुऱ्हाळपाणी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी घडली. विशेष म्हणजे तीन ते चार महिन्यांपूर्वी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी या क्षेत्राला भेट दिली होती. त्यावेळी त्यांना देखील थुवाणपाणीपर्यंत पायीचालत यावे लागले, त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांना रस्त्याची मागणी केली होती. मात्र अद्यापही रस्त्याबाबत काही कारवाई न झाल्याने नागरिकांची प्रतीक्षा कायमचं आहे. या दुर्गम भागात रस्त्याची सुविधा पुरवावी, अशी मागणी होत आहे.

गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत दहा ते बारा खेडे येतात. आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासुन रस्त्याची मागणी करत आहोत. मात्र याबाबत कोणीही गांभीर्य घेतलेले नाही. या क्षेत्रात रस्त्याची सुविधा पुरविण्यात याव्यात. अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य यांनी केली आहे
– राजेंद्रसिंग पावरा, माजी ग्रा.पं.सदस्य, गुन्हाडपाणी

Published on: Jul 16, 2023 02:50 PM
‘भ्रष्टाचाराचा खालपासून वरपर्यंत कळस’; काँग्रेस नेत्याची सरकारवर टीकास्त्र
‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर…’ म्हणाणाऱ्या आमदाराचा अजित पवार गटात प्रवेश