तेलंगणात कांदा वधारला; मात्र मालेगाव दर कोसळल्याने संतप्त शेतकऱ्याने थेट कार्यालयातच….
कांद्याला भाव मिळत नसल्याने औरंगाबादचे कांदा उत्पादक तेलंगणा गाठत आहेत. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याच जिल्ह्यातून ट्रकच्या ट्रक कांदा तेलंगणात जात आहे. तेथे महाराष्ट्रापेक्षा 4 पट जादा दर मिळत आहे.
मालेगाव : कांद्याची राज्यात सगळ्यात मोठी बाजारपेठ नाशिक जिल्ह्यात असूनही शेतकऱ्यांना दर मिळत नाही. कांद्याला भाव मिळत नसल्याने औरंगाबादचे कांदा उत्पादक तेलंगणा गाठत आहेत. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याच जिल्ह्यातून ट्रकच्या ट्रक कांदा तेलंगणात जात आहे. तेथे महाराष्ट्रापेक्षा 4 पट जादा दर मिळत आहे. मात्र राज्यात तो 400 आणि 500 रून दराने घेतला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हातबल झाले आहेत. मुंगसे उपबाजारात मंगळवारी कांद्याला कमी दर मिळाल्याने एका शेतकऱ्याने थेट बाजार समितीच्या कार्यालयात आणि महामार्गावर कांदा ओतत संताप व्यक्त केला. यावेळी बाजारात आलेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या शेती धोरणाचा निषेध व्यक्त केला यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
Published on: Jun 14, 2023 01:19 PM