अजित पवार यांनी जुळवून घेतलं मात्र मिटकरी याचं फिस्कटलं; राणे-मिटकरी यांच्यात जोरदार वाजतंय?

| Updated on: Jul 15, 2023 | 1:34 PM

अजित पवार गटाच्या प्रवेशाने भाजपसह शिंदे गटातील अनेक नेते नाराज झाले आहेत. यावरून वरिष्ठ नेत्यांच्यात मनोमिलन झाले असले तरी नेत्यांच्यात सध्या वाकयुद्ध रंगल्याचे पहायला मिळत आहे.

मुंबई : अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्याशी जुळवून घेत थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना आता सत्तेची फळे चाखायला मिळत आहेत. तर अजित पवार गटाच्या प्रवेशाने भाजपसह शिंदे गटातील अनेक नेते नाराज झाले आहेत. यावरून वरिष्ठ नेत्यांच्यात मनोमिलन झाले असले तरी नेत्यांच्यात सध्या वाकयुद्ध रंगल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी आणि भाजप आमदार निलेश राणे यांच्यात सध्या ट्विटरवॉर पहायला मिळत आहे. मिटकरी यांनी मोठं वक्तव्य करताना, मी अजित पवारांना समर्थन दिलं आहे. मात्र, याचा अर्थ मी भाजपचा प्रचारक असेल किंवा भाजप सत्तेवर जाण्यासाठी मी प्रयत्न करेल असा नाही”, असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं होतं. त्यावर निलेश राणे यांनी खोचक ट्वीट करत “आत्ताच कुठेतरी वाचलं. मिटकरी म्हणतो मी भाजपचा प्रचार करणार नाही. मिटकरी नेमका कोण आहे? आमच्या कोकणात मिटकरीसारख्या लोकांना शिमग्यातला गोमू म्हणतात. काही लोकांना भलताच कॉन्फिडन्स असतो, अशी टीका निलेश राणेंनी केली. त्यावर पुन्हा मिटकरी यांनी पलटवार करताना, अबे तु नेमका कुणाचा प्रचार करणार ते ठरव आधी आणि गप राहायला शिक जरा.. तृतीयपंथीयांनी तुला तुझी लायकी दाखवली आहेच. कशाला वारंवर तोंड काळ करुन घेतोस? अशी खरमरीत उत्तर दिलं आहे. तर राणे-मिटकरी यांच्यातील या वादामुळे भाजप आणि अजित पवार गटात वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Published on: Jul 15, 2023 01:33 PM
काँग्रेसबद्दल अंधारे यांचे सुटक वक्तव्य; ‘काँग्रेसला अच्छे दिन…’ तर भुजबळ यांच्याबद्दल म्हणाल्या,
शरद पवार गटाला धक्का; नाशकातील आनखी ‘एक’ आमदार अजित पवार गटाच्या गळाला