आधी कांद्यानं रडवलं आता कंबरडं मोडल; अवकाळीमुळे कांदा सडला? शेतकऱ्याची आर्थिक कोंडी

| Updated on: May 28, 2023 | 8:04 AM

धुळ्यात झालेल्या अवकाळीने कांदा पिकांचे मोठं नुकसान केलं असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडं मोडल आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहे.

धुळे : याच्याआधी झालेल्या अवकाळीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांने प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी नुकसान भरपाईसाठी पंचनामे केले जात आहेत. त्याची भरपाई कुठं जमा झाली तर कुठं अजून पंचनामे सुरू आहेत. त्यातच धुळ्यात झालेल्या अवकाळीने कांदा पिकांचे मोठं नुकसान केलं असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडं मोडल आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहे. त्यामुले कांदा फेकून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. कांदा उत्पादनासाठी अग्रेसर मानले जाणाऱ्या धुळे तालुक्यातील परिसरात शेतकऱ्यांनी शेतातच कांदा फेकला असून भाव मिळत नसलेले अखेरीस खत बनवण्यासाठी कांद्याचा वापर केला जात आहे. अवकाळी पावसामुळे कांदा पिकाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. त्यातच गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कांद्याचे दर घसरत असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे.

Published on: May 28, 2023 08:04 AM
“…तर संजय राऊत तुरुंगात गेले नसते”, नितेश राणे यांच्या टीकेला सुनील राऊत यांचा पलटवार; म्हणाले…
Special Report | वादाचा कलगीतुरा, गौतमीच्या ‘पाटील’ आडनावाच्या वादात राजकीय नेत्यांची उडी