सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांचा मोठा निर्णय; राष्ट्रवादीच्या आमदारांना गिफ्ट, स्थगितीही उठवली
यावेळी त्यांनी अर्थमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर पैशांचा वर्षाव केला आहे. तर आपल्या आमदारांवर देखील कृपादृष्टी केली आहे. शिंदे गटातील आमदारांना देखील निधी दिला आहे.
मुंबई, 23 जुलै 2023 | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अजित पवार यांनी विकास निधीचे वाटप करताना अनेकांना धक्का दिला आहे. यावेळी त्यांनी अर्थमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर पैशांचा वर्षाव केला आहे. तर आपल्या आमदारांवर देखील कृपादृष्टी केली आहे. शिंदे गटातील आमदारांना देखील निधी दिला आहे. मात्र, शिंदे गटाच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या आमदारांना सर्वाधिक निधी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर मागिल काळात शिंदे-फडणवीस सरकारने लावलेला विकासकामांवरच्या निधीच्या ब्रेलला देखील काढून टाकला आहे. अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या विकासकामांसाठी १ हजार ५०० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. आमदारांसाठी 25 ते 50 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना 25-25 कोटींचा निधी देण्यात आला आहे. काही आमदारांना 40 कोटींचा निधी देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे गटातील काही आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना निधीही देण्यात आला आहे. मात्र त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी दिल्याची चर्चा आहे.