ईडीची ‘त्या’ मालमत्तेवर टाच? अनिल परब यांना जोरदार झटका

| Updated on: Jul 20, 2023 | 7:55 AM

तर साई रिसॉर्ट प्रकरणात मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप सोमय्या यांनी परब यांच्यावर केला होता. त्याप्रकरणी परब यांची सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीने अटक केली होती.

रत्नागिरी, 20 जुलै 2023 | शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यांवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्ट प्रकरणावरून आरोप केले होते. तर साई रिसॉर्ट प्रकरणात मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप सोमय्या यांनी परब यांच्यावर केला होता. त्याप्रकरणी परब यांची सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीने अटक केली होती. तर परब यांना हायकोर्टाकडून अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. मात्र याप्रकरणात आता परब यांना मोठा झटका बसल्याचे समोर येत आहे. ईडीकडून दापोली येथील साई रिसॉर्टवर ताबा घेण्यात आला असून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. तर साई रिसॉर्टचे बांधकाम हे CRZ कायद्याचं उल्लंघन करून करण्यात आलं असून त्यात मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर प्रकऱणी गोल्या दोन वर्षापासून सोमय्या हे पाठपुरावा करत होते. त्यानंतर आता दापोली येथील साई रिसॉर्ट हे ईडीकडून तात्पुरते जप्त करण्यात आले आहे.

Published on: Jul 20, 2023 07:55 AM
राष्ट्रवादीतील बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी घेतली अजित पवार यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण!
अजित पवार यांची भेट का घेतली? उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “जनतेला न्याय…”