Anil Parab यांना ईडीचं समन्स;परबांची उद्या चौकशी होणार
अनिल परब यांचे घर, कार्यालय, साई रिसॉर्ट आणि परब यांचे निकटवर्तीय यांच्यावर ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी परब यांना ईडीने नोटीस बजावत चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी शिवसेना नेते अनिल परब यांना ईडी समन्स बजावले आहे. चौकशीसाठी उद्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहे. साई रिसॉर्टमधील गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु असून यासंदर्भात ईडीने सात ठिकाणी छापेमारी केली आहे. अनिल परब यांचे घर, कार्यालय, साई रिसॉर्ट आणि परब यांचे निकटवर्तीय यांच्यावर ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी परब यांना ईडीने नोटीस बजावत चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
Published on: Jun 15, 2022 12:53 AM