सुजीत पाटकर प्रकरणात IAS अधिकारीही ईडीच्या पट्ट्यात; जैस्वाल यांच्या घरावर छापा

| Updated on: Jun 21, 2023 | 2:11 PM

कथीत घोटाळा प्रकरणात आता ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी लाईफलाईन कंपनीसंबंधीत वेगवेगळ्या 10 ठिकाणांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. आज सकाळीच ही छापेमारी करण्यात आली.

मुंबई : कोरोना काळात पुण्यासह मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर्समध्ये झालेल्या कथीत घोटाळा प्रकरणात आता ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी लाईफलाईन कंपनीसंबंधीत वेगवेगळ्या 10 ठिकाणांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. आज सकाळीच ही छापेमारी करण्यात आली. तर यात सुजीत पाटकर यांच्या संबंधित ठिकाणीच ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. ज्यात IAS अधिकारी संजीव जैस्वाल यांचा ही समावेश आहे. तर यावेळी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सूरज चव्हाण यांच्या घरावर देखील ईडीकडून सर्च ऑपरेशन केलं जात आहे. ईडीच्या विविध ठिकाणी पडलेल्या या धाडीमुळे खळबळ उडाली आहे.

Published on: Jun 21, 2023 02:11 PM
ठाकरे गटाच्या आमदाराला महापालिकेचा झटका; पालिका निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव, नेमकं कारण काय?
ED raid : सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीने धाड; किरीट सोमय्या म्हणतात…