हसन मुश्रीफांच्या अडचणी वाढल्या; झाडाझडतीनंतर आज होणार चौकशी
मुश्रीफांच्या घरची ईडीच्या पाच ते सहा अधिकाऱ्यांनी तब्बल साडेनऊ तास ही झाडाझडती घेतली. त्यानंतर ईडीकडून मुश्रीफ यांना चौकशीसाठी हजर राहण्याचा समन्स देण्यात आले
मुंबई : राज्याचे माजी मंत्री, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर गेल्या दीड महिन्यात दोन वेळी ईडीने छापेमारी केली. मुश्रीफांच्या घरची ईडीच्या पाच ते सहा अधिकाऱ्यांनी तब्बल साडेनऊ तास ही झाडाझडती घेतली. त्यानंतर ईडीकडून मुश्रीफ यांना चौकशीसाठी हजर राहण्याचा समन्स देण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात मुश्रीफ अडचणीत आल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे मुश्रीफ उद्या चौकशीला सामोर जाणार की वकीलामार्फत बाजू मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.