Editorial of Saamana : नड्डाजी, जरा जपून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना शिवसेनेचा सल्ला
शिवसेना तर वाघ आहे. त्यामुळे वाघाची झेप तुम्हाला परवडणार नाही, असा सल्ला वजा इंशारा शिवसेनेने जेपी नड्डांना दिला आहे. दैनिक सामनाच्या अग्रलेखातून हा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य करण्यात आलंय. दैनिक सामनाच्या आजच्यास अग्रलेखात म्हटलंय की. ‘ जे. पी. नड्डा यांनी हे समजून घेतले पाहिजे. नड्डा यांनी सर्व प्रादेशिक पक्षांना असा शाप दिला आहे की, भाजपच राहील व बाकीचे सगळे संपतील. मऱ्हाटीत एक म्हण आहे ती म्हणजे, कावळय़ाच्या शापाने गाय मरत नाही! नड्डा साहेबांना या म्हणीचा अर्थ समजावून सांगितला पाहिजे.’ असं अग्रलेखात म्हटलंय. शिवसेना (shivsena) संपत चालली आहे, असं विधान भाजपचे (bjp) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (jp nadda) यांनी केलं होतं. नड्डा यांच्या या विधानाचा शिवसेनेने समाचार घेतला आहे. पुढे अग्रलेखात म्हटलंय की, ‘भाजपने खोटा खोटा का होईना, गोवंश हत्याबंदीचा कायदा केला आहे. त्यामुळे कावळ्यांच्या शापाने प्रादेशिक पक्षांच्या गायी मरणार नाहीत. उलट गोवंश वाढतच जाईल. कावळे मात्र नष्ट होतील. शिवसेना तर वाघ आहे. त्यामुळे वाघाची झेप तुम्हाला परवडणार नाही, असा सल्ला वजा इशारा शिवसेनेने जेपी नड्डा यांना दिला आहे. दैनिक सामनाच्या अग्रलेखातून हा इशारा देण्यात आला आहे.