टीईटी घोटाळ्यानंतर सगळ्यात मोठा घोटाळा, दहावीचं बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांचा पर्दाफाश; 2 हजारहून अधिक प्रमाणपत्र…
येथे दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याचे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला आहे. याप्रकरणात दोन मोठ्या एजंटांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खाक्या दाखवत ताब्यात घेतलं आहे.
पुणे : महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवून देणारा टीईटी घोटाळा उघड झाल्यानंतर आता दुसरा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. ज्यामुळे अनेकांच्या डोल्यासमोर अंधारी तर अनेकांना असंही होऊ शकतं असा प्रश्न पडला आहे. येथे दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याचे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला आहे. याप्रकरणात दोन मोठ्या एजंटांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खाक्या दाखवत ताब्यात घेतलं आहे. तर याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. तर या तपासात आतापर्यंत तब्बल 2 हजार 739 दहावी, बारावीचे बनावट प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचे उघड झाले आहे. तर जमाल शेख आणि महेश विश्वकर्मा यो दोन बड्या एजंटांनी महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूलसारखी बनावट बेवसाइट बनवली होती. ज्याद्वारे 60 हजार रुपयांमध्ये प्रमाणपत्र दिले जात होते. तर राज्यात 15 एजंट नियुक्त असल्याचेही धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.