उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा आणखी एक मोठा धक्का; ‘या’ 8 राज्यातील शिवसेना राज्यप्रमुखांचा शिंदे गटाला पाठिंबा

| Updated on: Sep 15, 2022 | 10:37 AM

शिवसेनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक धक्का दिला आहे. शिवसेनेच्या आठ राज्यप्रमुखांनी शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे शिवसेनेकडे केवळ दोनच राज्यप्रमुख शिल्लक आहेत.

मुंबई :  उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) शिंदे गटाकडून धक्क्यावर धक्के बसत आहेत. शिवसेनेमध्ये (Shiv Sena) सुरू झालेली गळती अद्यापही थांबलेली नाही. आता शिवसेनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आणखी एक धक्का दिला आहे. शिवसेनेच्या आठ राज्यप्रमुखांनी शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे शिवसेनेकडे केवळ दोनच राज्यप्रमुख शिल्लक आहेत. दिल्ली, मध्यप्रदेश, छत्तीसगडसह इतर पाच राज्यातील राज्यप्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत शिंदे गटाची एक बैठक पार पडली होती. या बैठकीत आठ राज्यातील राज्यप्रमुखांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून शिवसेनेमध्ये सुरू असलेली गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे मात्र अनेक जण शिवसेनेतून बाहेर पडत शिंदे गटात सहभागी होत असल्याचं चित्र आहे.

 

 

Published on: Sep 15, 2022 10:37 AM
Video | दुसऱ्या प्रकल्पाचं गाजर नको, वेदांताच महाराष्ट्रात आणा, विरोधी पक्ष नेते अजित पवारांची मागणी
वेदांता प्रकल्प बाहेर जाता कामा नये: अजित पवार