एक तर बायको द्या, नाही तर घरकुल द्या; वैतागलेल्या तरुणाने केली अजब गजब मागणी
गटविकास अधिकारी यांच्याकडे त्याने एक निवेदन दिलेय. पाच वर्षापूर्वी घरासाठी अर्ज केला. पण, आता एक तर घर द्या किंवा मला बायको द्या अशी अजब मागणी त्याने केलीय. घर नसल्याने बायको मिळत नाही असे या तरुणाचे म्हणणे आहे.
बुलढाणा : 4 ऑक्टोबर 2023 | एका 30 वर्षीय तरुणाने गटविकास अधिकाऱ्यांकडे अजब मागणी केलीय. गावात मागील पाच वर्षात फक्त पाच घरे झाली. मग मला आता काय म्हातारा झाल्यावर घरकुल देता का? असा सवाल त्याने केलाय. बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कोदरी या गावचा हा तरुण रहिवाशी आहे. 30 वर्ष वय असलेल्या या तरुणाचे नाव अंकुश कड असे आहे. अंकुश याने घरकुल योजनेतून घर मिळावे यासाठी अर्ज केला. घरकुल योजनेच्या यादीत त्याचा 35 वा क्रमांक आहे. पण, विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात गावात या योजनेमधून फक्त पाच घरे बांधली आहेत. त्यामुळे माझा नंबर येईपर्यंत मी म्हातारा होईल. घर नसल्याने मला कुणी बायको पण देत नाही. त्यामुळे म्हातारा झाल्यावर घरकुल देता का? असा सवाल अंकुश कड याने केला.
Published on: Oct 04, 2023 07:39 PM