Video : “मी पुन्हा येईन’ या नादात माझंच फोन टॅपिंग”, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

| Updated on: Apr 11, 2022 | 5:34 PM

राज्यात सध्या फोन टॅपिंगवरून (Phone Tapping) जोरदार आरोप सुरू झाले आहेत. याबाबत ज्या नेत्यांचे फोन टॅप केले त्यांचे जबाब आताा नोंदवण्यात येत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला आता चांगलाच वेग आणला आहे. या प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर आधीच गुन्हा दाखल झाला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप करण्यात […]

राज्यात सध्या फोन टॅपिंगवरून (Phone Tapping) जोरदार आरोप सुरू झाले आहेत. याबाबत ज्या नेत्यांचे फोन टॅप केले त्यांचे जबाब आताा नोंदवण्यात येत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला आता चांगलाच वेग आणला आहे. या प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर आधीच गुन्हा दाखल झाला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. आता याचवरून फडणवीसांचा कट्टर विरोधक एकनाथ खडसेही (Eknath Khadase) चांगलेच आक्रमक झाले आहेत. कारण एकनाथ खडसे यांचाही फोन टॅप केल्याचा आरोप आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, या नादात माझं फोन टॅपिंग करण्यात आलं, असे म्हणत खडसेंनी पुन्हा फडवीसांवर निशाणा साधला आहे.

VIDEO : माझी छळवणूक करण्याचा मविआ सरकारचा प्रयत्न – Pravin Darekar
Video : फोन टॅपिंग करणं धक्कादायक- जयंत पाटील