Eknath Khadse | ‘मतदारसंघात कामं न करता 9 कोटीची बिलं काढली’ खडसे
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघात काम न करता 9 कोटी रुपयाची बिल काढली, असा गंभीर एकनाथ खडसेंनी केला.
जळगाव : मुख्यमंत्री मुक्ताईनगर दौऱ्यावर येत असतानाच एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपावरुन जुंपली. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघात काम न करता 9 कोटी रुपयाची बिल काढली, असा गंभीर एकनाथ खडसेंनी केला. खडसेंनी पत्रकार परिषदेतच हा गंभीर आरोप केला. चंद्रकांत पाटील यांनी खडसेंचे आरोप फेटाळले आहेत. एकनाथ खडसे यांना मानस उपचार तज्ञ यांच्याकडे दाखवण्याची वेळ आली आहे, खडसेंचे आरोप धादांत खोटे असे चंद्रकांत पाटील म्हणाले.