एकनाथ खडसे यांनी मागितला या दोन मंत्र्यांचा राजीनामा, म्हणाले ‘माझ्यावर आरोप झाले तेव्हा…’
माझ्यावर आरोप झाले तेव्हा मला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन माझी चौकशी करण्यात आली. तो न्याय आताच्या मंत्र्यांना का नाही? माझ्यावर कारवाई केली तशीच कारवाई दोन्ही मंत्र्याची करण्यात यावी. त्याची चौकशी लावावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलीय.
मुंबई : 13 ऑक्टोबर 2023 | गिरीश महाजन हे मोक्काचे आरोपी आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप झाले आहेत. आत्ता ते अंतरिम जामिनावर बाहेर आहेत. गिरीश महाजन आणि दादा भुसे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन चौकशी करण्यात यावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केलीय. सरकारमधील मंत्रीच आत्ता या ड्रग्स माफिया लोकांना मदत करत आहेत. या राज्यात हजारो महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यांची आकडेवारी आज शरद पवार यांनी जाहीर केली आहे. याला सर्वस्वी सत्ताधारी जबाबदार आहेत. मी अनेकदा काही महत्वाचे पुरावे आणि ड्रग्स माफिया, मोठे लोकांची नावे देवेंद्र फडणवीस यांना दिली आहेत. पण, त्यावर कारवाई केली नाही. कारवाई करण्याची नुसती आश्वासन दिली असेही ते म्हणाले. 2019 नंतर फोडाफोडीच राजकारण झाले याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. देवेंद्र फडणवीस बोलतात एक त्याच्या उलट करतात हे नेहमीच तसे करतात अशी टीकाही त्यांनी केलीय.