खडसे म्हणतात, ‘मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाल्यास त्यांच्याकडे दोनच पर्याय’

| Updated on: Aug 15, 2023 | 7:41 AM

त्यांनी शिंदे गटावर अपात्रतेच्या कारवाई झाल्यास भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊ. तसेच कमळ चिन्हावर सुद्धा निवडणूक लढवू असं वक्तव्य केलं होतं. तर याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील तर ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे म्हटलं होतं.

जळगाव, 15 ऑगस्ट 2023 | गेल्या दोन दिवसापूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार किशोर पाटील यांनी शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाई आणि भाजप चिन्हावरून वक्तव्य केलं होतं. त्यांनी शिंदे गटावर अपात्रतेच्या कारवाई झाल्यास भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊ. तसेच कमळ चिन्हावर सुद्धा निवडणूक लढवू असं वक्तव्य केलं होतं. तर याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील तर ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे म्हटलं होतं. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यावरून माजी मंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे व त्यांचे आमदार हे भाजपमध्ये जातील हा निर्णय आजचा नाही हा निर्णय आधीच झालेला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर अपात्रता टाळण्यासाठी एकनाथ शिंदे व त्यांच्या आमदारांना भाजपमध्ये जावं लागेल असेही ते म्हणालेत.

Published on: Aug 15, 2023 07:41 AM
राज ठाकरे यांना भाजपनं दिलेल्या ऑफरवर प्रतापराव जाधव म्हणतात…
विजय वटेट्टीवार यांच्या ‘त्या’ टीकेला मंत्री गुलाबराव पाटील यांचा टोला; म्हणाले, ‘ते’ कारण काढणं दुर्दैवी