‘मलिक हे जर भाजपमध्ये गेले तर ते स्वच्छ होऊन बाहेर येतील?’ राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

| Updated on: Aug 12, 2023 | 1:23 PM

त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटासह अजित पवार गटाकडून जल्लोष साजरा केला जात आहे. मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून त्यांची 17 महिन्यानंतर सुटका होणार आहे. मात्र यावेळी त्यांना भाजपडून ऑफर देण्यात आली असून ते भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी हा जामीन देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

जळगाव, 12 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना दीड महिन्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटासह अजित पवार गटाकडून जल्लोष साजरा केला जात आहे. मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून त्यांची 17 महिन्यानंतर सुटका होणार आहे. मात्र यावेळी त्यांना भाजपडून ऑफर देण्यात आली असून ते भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी हा जामीन देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी यावर भाष्य केलं आहे. शरद पवार यांचे नवाब मलिक यांच्यावर उपकार आहेत. तर मलिक यांना खूप वेळेस पवार यांनी राजकारणात संधी दिली आहे. तर मलिक यांचे देखील पक्षासाठी खूप मोठे योगदान आहे. त्यामुळेच नवाब मलिक हे शरद पवार यांच्या सोबत राहतील. तर नवाब मलिक हे जर भाजपमध्ये गेले तर ते स्वच्छ होऊन बाहेर येतील असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे. तर ते भाजपमध्ये जातील की नाही हे काळच ठरवेल असं सुचक वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे.

Published on: Aug 12, 2023 01:23 PM
‘ब्रिटिशांच्याहीपेक्षा भयंकर कायदे निर्माण केलेत’; मलिक कसे सुटले? यावरही राऊत यांचे भाष्य, पाहा काय म्हणाले राऊत…
‘तीन इंजिनच्या सरकारमध्ये कुरगुडी मोठ्या प्रमाणात’; राष्ट्रवादी नेत्याचं मंत्रिमंडळ विस्तारावर सरकारवर टीकास्त्र