Chandrayaan-3 : ‘आपली पिढी खूपच नशीबवान’; चांद्रयान मोहीमेवरून एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया
चांद्रयान-3 ही मोहीम फत्ते झाली. भारताचा जगात अभिमान वाढला आहे. पण याच्या आधी सर्वच भारतीयांच्या मनात धाकधूक लागली होती. काहूर माजलं होतं. त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांना देखील या मोहीमेची उत्सुकता होती. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली.
जळगाव : 24 ऑगस्ट 2023 | चांद्रयान-3 या मोहीमेसाठी इस्त्रोचे शास्त्रज्ञ दिवस रात्र झटत होते. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर काल यश आलं आणि चांद्रयान-3 ही मोहिम काल फत्ते झाली. यानंतर देशात एकच जल्लोष झाला. ढोलताशे, फटाके फोडत पेढे भरवण्यासह लाढू वाटण्यात आले. देशातील प्रत्येक नागरिकांने यावरून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे मनापासून अभिनंदन केले. त्याचे स्टेटस सोशल मिडियावर झळकत होते. मात्र याच्याआधी चंद्रयान-३ मोहीम यशस्वी होईल असा विश्वास राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात शरद पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उपस्थितीत बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी या मोहिमेत सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या, चांद्रयान-३ ही मोहीम जगात देशाची मान उंचावणारी आहे. या मोहीमेमुळे भारत जगात पहिला देश ठरणार असल्याचा आनंद आहे. अभिमान आहे. ही मोहीम आपल्या पिढीला याची दोही याची डोळा पाहता येणार असल्याने आपण खूपच नशीबवान असल्याचं ही एकनाथ खडसे यांनी म्हटल आहे.