बीआरएस, एमआयएमच्या ऑफरवर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पंकजा जिथे आहेत, तिथे…”
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीआरएसने थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत पक्षात येण्यासाठी आवाहन केलं आहे. तर एमआयएमने आम्ही तर पंकजा यांना दोन वर्षापुर्वीच मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जळगाव: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीआरएसने थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत पक्षात येण्यासाठी आवाहन केलं आहे. तर एमआयएमने आम्ही तर पंकजा यांना दोन वर्षापुर्वीच मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पंकजाताई मुंडे या एक लोकप्रिय नेत्या आहेत. पंकजा मुंडे यांना संपूर्ण महाराष्ट्रात मानणारा एक वर्ग आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाला असं वाटतं की पंकजा मुंडे या आमच्या पक्षात असाव्यात, जेणेकरून त्यांच्या पक्षप्रवेशाने त्या पक्षाला बळ मिळेल. त्यामुळे मला नाही वाटत पंकजा मुंडे या कोणत्या पक्षात जाण्याचा विचार करत असतील. पंकजा मुंडे हे ज्या ठिकाणी आहेत त्या व्यवस्थित आहेत. पंकजा मुंडेंना मुख्यमंत्र्यांची ऑफर असली तरी बीआरएस पक्षात त्या जाणार नाहीत,” असं खडसे म्हणाले.