जागावाटपावरून मविआत वादंग, संजय राऊत यांच्या ‘त्या’ विधानावर एकनाथ खडसे म्हणतात…
ठाकरे गटाचे खासदार यांनी संजय राऊत यांनी लोकसभा 2024 च्या निवडणुकांसाठी मविआचा 16+16 असा कोणताही फॉर्म्यूला ठरलेला नाही, ठाकरे गट 19 जागा लढवणारचं असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया दिली आहे.
जळगाव : ठाकरे गटाचे खासदार यांनी संजय राऊत यांनी लोकसभा 2024 च्या निवडणुकांसाठी मविआचा 16+16 असा कोणताही फॉर्म्यूला ठरलेला नाही, ठाकरे गट 19 जागा लढवणारचं असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया दिली आहे.’महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या कुठल्याही जागा वाटपाबाबत सूत्र अद्याप ठरलेलं नाही, असे राष्ट्रवादीच्यावतीने ही वारंवार सांगण्यात आलेलं आहे. एकत्र बसून जागा वाटपाबाबत चर्चा होईल.कोणी, किती जागा लढवायच्या याबाबत चर्चा विनिमय होईल.माझ्या माहितीप्रमाणे अद्याप जागा वाटपाबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
Published on: May 19, 2023 04:42 PM