“फडणवीसांची लोकप्रियता कमी दाखवण्यात आली” , शिवसेनेच्या जाहिरातीवरून एकनाथ खडसेंचा चिमटा

| Updated on: Jun 15, 2023 | 9:13 AM

राज्यात दोन दिवसापासून शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये सुरू असलेल्या जाहिरातबाजीवरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, "शिवसेनेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नव्हता.

जळगाव : राज्यात दोन दिवसापासून शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये सुरू असलेल्या जाहिरातबाजीवरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, “शिवसेनेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नव्हता. जाहिरातीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता खूपच कमी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून आगामी निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व पुढे आणण्याचे उद्दिष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व फेल गेल्याचं दाखवलं आहे. दुसरी जाहिरात का आली?, तर आधीच्या जाहिरातीवरून शिवसेना-भाजप मधील धुसफुस बाहेर आली आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

Published on: Jun 15, 2023 09:13 AM
जितेंद्र आव्हाड यांच्या खोचक टोला; मनसे नेत्याचा पलटवार; खरमरीत टीका करत म्हणाला, ‘ते आधी उंबरटे झिजवायचे’
Special Report | जुन्यावरून वाद, नवीन जाहिरात दिली, मात्र डॅमेज कंट्रोल काही झालं नाही; उलट काय झालं पहा युतीत…