‘तीन इंजिनच्या सरकारमध्ये कुरगुडी मोठ्या प्रमाणात’; राष्ट्रवादी नेत्याचं मंत्रिमंडळ विस्तारावर सरकारवर टीकास्त्र

| Updated on: Aug 12, 2023 | 1:37 PM

शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये कुरबूरी होत आहे अशी चर्चा रंगली आहे. यावरून तर पालकमंत्री नियुक्तीवरून नाराजी असल्याचेही दिसत आहे. यावरून यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी सरकारवर टीका केली आहे.

जळगाव, 12 ऑगस्ट 2023 | सध्या राज्यात यावेळी देखील ध्वजारोहणावरून वाद होताना दिसत आहे. तर शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये कुरबूरी होत आहे अशी चर्चा रंगली आहे. यावरून तर पालकमंत्री नियुक्तीवरून नाराजी असल्याचेही दिसत आहे. यावरून यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी सरकारवर टीका केली आहे. खडसे यांनी, या तीन इंजिनच्या सरकारमध्ये आपसात अनेक भानगडी आहेत. तर शिंदे फडणवीस या दोघांचा जमत नव्हतं. पण आता राष्ट्रवादी सत्तेत आल्यामुळे सत्तेची वाटणी झाली आहे. त्यामुळे तीन इंजिनच्या सरकारमध्ये कुरगुडी मोठ्या प्रमाणात होतील. म्हणूनच तिसरा मंत्रि मंडळ विस्तार रखडल्याची टीका त्यांनी केली आहे.

Published on: Aug 12, 2023 01:37 PM
‘मलिक हे जर भाजपमध्ये गेले तर ते स्वच्छ होऊन बाहेर येतील?’ राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य
फेसबूक पोस्ट करत नाराजी व्यक्त करणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी दोनच शब्दात व्यक्त केली प्रतिक्रिया; म्हणाल्या…