“तुम्हीही मालक बदलला, मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादांसोबत…” एकनाथ खडसे यांचा फडणवीस यांना पलटवार

| Updated on: Jun 28, 2023 | 9:50 AM

शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त काल मुख्यमंत् एकनाथ शिंदे आणि उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी कांदा आणि कापूस दराच्या प्रश्नावरून शिंदे-फडणवीसांना काळे झेंडे दाखवले. यानंतर आता एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली आहे.

जळगाव: शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त काल मुख्यमंत् एकनाथ शिंदे आणि उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी कांदा आणि कापूस दराच्या प्रश्नावरून शिंदे-फडणवीसांना काळे झेंडे दाखवले. यानंतर आता एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली आहे. “एकनाथ खडसेंनी मालक बदलला आहे. नवीन मालक जसं सांगतील तसं एकनाथ खडसे वागतात. जमिनीमध्ये जर त्यांनी तोंड काळ केलं नसतं, तर त्यांना काळे झेंडे दाखवण्याची वेळ आली नसती,” असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या या टीकेला एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मी मालक बदलला असं म्हणण्यापेक्षा कापसाला भाव द्या. तुम्हीही मालक बदलला होता. सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही लाचार होऊन अजित पवारांबरोबर सरकार स्थापन केलं होतं, हा इतिहास पुसता येणार नाही.तुमचा फौजादाराचा हवालदार झाला. तुम्ही हे सत्तेसाठी केलं, मग दुसऱ्यांना दोष का देत आहात,” अशी टीका एकनाथ खडसेंनी केली.

Published on: Jun 28, 2023 09:50 AM
‘वादग्रस्त विधानं करूनही भिडे यांना अभय?’ जितेंद्र आव्हाड संतापले, म्हणाले, कसली भीती सरकारला वाटतेयं?
“जेलमध्ये जाण्याची स्थिती निर्माण झाल्यानं विरोधक एकत्र”, पाटण्यातील बैठकीवरून भाजप नेत्याची टीका