मोठी बातमी! एकनाथ खडसे यांच्या जावयाला जामीन मंजूर!
शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जामीन मंजूर झाला आहे.
मुंबई, 21 जुलै 2023 | शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जामीन मंजूर झाला आहे. भोसरी एमआयडीसी प्रकरणी अखेर सुप्रीम कोर्टाने गिरीश चौधरी यांचा जामीन मंजूर केला आहे. ईडीच्या कारवाईवर सुप्रीय कोर्टाने ताशोरे ओढले आहेत. तसेच या प्रकरणी त्यांच्या खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांची देखील तपासादरम्यान चौकशी करण्यात आली होती. यापूर्वी या प्रकरणात भाजपा-शिवसेना सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना, त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
Published on: Jul 21, 2023 01:40 PM