‘भ्रष्टाचारी राष्ट्रवादी आता स्वच्छ झाली का?’, पंतप्रधान मोदी यांना राष्ट्रवादी नेत्याचा खोचक सवाल

| Updated on: Aug 24, 2023 | 10:40 AM

शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत आज जोरदार टोलेबाजी केली. त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली.

जळगाव : 24 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भाजपमध्ये जाईल, अजित पवार हे भाजपच्या वाटेवर तर अशा चर्चा होत होत्या. मात्र त्यावरर अजित पवार यांनी मी जाणार नाही असे स्पष्ट केलं होतं. तर मी एक वेळ लग्न न करणे, अविवाहित राहणं पसंत करेन. मात्र राष्ट्रवादीशी युती करणार नाही. नाही…नाही… नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर भाषणात राष्ट्रवादी ही भ्रष्टाचारी पार्टी असल्याचे सांगत भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांनी ७० हजार कोटींचा भ्रष्टाचाराचे आरोप राष्ट्रवादीवर केले होते. तर आपण भ्रष्टाचार करणाऱ्या कुणाला सोडणार नाही असे देखील त्यांनी सांगितल होते. त्यानंतरच अजित पवार आणि त्यांचा गट हा भाजपच्या सत्तेत सहभागी झाला होता. त्यावरूनच शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह अजित पवार आणि त्यांच्या गटावर टीका केली आहे. आपल्यावर ईडीची कारवाई होईल याच भीतीने अजित पवार यांच्यासह सर्व आमदार भाजप सरकारमध्ये सहभागी झाल्याचा दावा खडसे यांनी केला आहे. तर ज्या पार्टीला मोदी भ्रष्टाचारी म्हणत होते ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता स्वच्छ झाली का असा सवाल खडसेंनी मोदी यांना केला आहे.

Published on: Aug 24, 2023 10:40 AM
‘काय खोटारडा माणूस आहे’; ‘त्या’ वक्तव्याची आठवण करून देत फडणवीस यांच्यावर कुणी केली घणाघाती टीका
धुळे जिल्ह्यात मका पिकांवर असं काय झालं की शेतकरी संकटात सापडला, घोंगावतयं दुबार पेरणीचंही संकट