Aditya Thackeray – Eknath Shinde : आदित्य ठाकरे – एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं

| Updated on: Mar 24, 2025 | 7:12 PM

All Party Meeting : राहुल नार्वेकरांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने आलेले बघायला मिळाले. यावेळी दोघांनी एकमेकांना बघणं टाळलं.

सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत आज शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समोरासमोर आलेले बघायला मिळाले. यावेळी एकनाथ शिंदे दालनात येताच आदित्य ठाकरे यांनी लक्ष दुसरीकडे वळवलं. तर ठाकरेंच्या आमदारांनी देखील उपमुख्यमंत्री शिंदे बैठकीच्या दालनात आल्यावर उभं राहणं टाळलं. सिमेंट रस्त्याबाबत ही सर्वपक्षीय बैठक आज पार पडली. मुंबईच्या रास्ते कामाबाबत राहुल नार्वेकर यांनी ही बैठक बोलावली होती. याच बैठकीत हा सगळा प्रकार घडला.

Published on: Mar 24, 2025 07:11 PM
आदित्य ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, एकनाथ शिंदे दालनात येताच…, काय घडलं बघाच?
Jayant Patil : मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर