‘निधी वाटपात एकनाथ शिंदे दुजाभाव करतात-भास्कर जाधव

| Updated on: Sep 12, 2022 | 2:24 PM

राज्याचा प्रमुख असतो त्याने राज्यातल्या जनतेकडे समन्यायाने पाहायचं असतं, परंतु जनतेला सुद्धा पश्चाताप झालेला आहे. ज्यांना झाला नव्हता त्यांनाही पश्चाताप होईल, की कोणती चुकीची माणसं सत्तेवर आली आहेत. बंडूशेठ जाधव आणि बाकीच्या लोकांची इथं खंबीरपणे शिवसेना आहे इथल्या स्थानिक लोकांना निश्चितपणे ते न्याय मिळवून देतील

परभणी – मी आता परभणीला(Parbhani) आमचे खासदार संजय बंडू जाधव यांच्या घरी आलो. परभणीचे परंपरा आहे, की ज्या त्यांनी मला सांगितली की या परभणी मधून अनेक लोक शिवसेनेच्या( तिकिटावर निवडून आले शिवसेनेला सोडून गेले. पण इथल्या जनतेने शिवसेनेला(Shivsena) कधीही सोडलं नाही. इथला खासदार हा शिवसेनेचाच कायम निवडून आला. इथला आमदार हा शिवसेनेचाच कायम निवडून आला आणि भविष्यामध्ये इथं खासदार तर निवडून येतीलच परंतु इथं आणखीन आमदारांची(MLA) भर परभणी जिल्हा टाकेल अशा प्रकारचा जिल्ह्याने मला विश्वास दिलाय. राज्याचा प्रमुख असतो त्याने राज्यातल्या जनतेकडे समन्यायाने पाहायचं असतं, परंतु जनतेला सुद्धा पश्चाताप झालेला आहे. ज्यांना झाला नव्हता त्यांनाही पश्चाताप होईल, की कोणती चुकीची माणसं सत्तेवर आली आहेत. बंडूशेठ जाधव आणि बाकीच्या लोकांची इथं खंबीरपणे शिवसेना आहे इथल्या स्थानिक लोकांना निश्चितपणे ते न्याय मिळवून देतील.

‘उद्धव ठाकरेंनी सगळंकाही दिलं, तरी भुमरेंनी बेईमानी केली’ -भास्कर जाधव
मुख्यमंत्र्यांची पैठण सभा! तुफान गर्दी